हिरवळ महाविद्यालयात तरंग कार्यक्रम

| माणगाव | वार्ताहर |

हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट सी.सी.एस.आय.टी., हिरवळ रात्र महाविद्यालय, ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, महाड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी नटलेला बहुप्रतिक्षित सांस्कृतिक कार्यक्रम तरंग 2023 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवासाठी प्रमुख अतिथी म्हणून हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या मुख्य सल्लागार डॉ. संध्या कुलकर्णी, हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे सेक्रेटरी संतोष बुटाला, प्रदीप शेठ, जय अंबुर्ले, प्राचार्य वासंती राजप्पन, जगदीश वर्तक, कुणाल गुरव, कुणाल चव्हाण उपस्थित होते.

या महोत्सवात महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कॅरम, बॅडमिंटन,चेस, व्हॉलीबॉल, रनिंग, रीले, क्रिकेट व विविध संस्कृती परंपरा-परफेक्ट डे, मिसमॅच डे, बॉलिवूड डे, ट्विंस डे, ब्लॅक अँड व्हाइट डे, ट्रॅडिशनल डे, टाई अँड सारी डे, तसेच फूड डेकोरेशन, फ्रूट कार्विंग, फ्लॉवर डेकोरेशन, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट, केक डेकोरेशन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौविण्यात आले.

Exit mobile version