। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
ऑल इंग्लंड ओपन बॅॅडमिंटन स्पर्धेत भारताचा आघाडीचा खेळाडू लक्ष्य सेनने पुरुष एकेरीच्या गटाची फायनल गाठली. त्याने मलेशियाच्या जियावर 21-13, 12-21, 21-19 ने मात केली. तर, युवा खेळाडू गायत्री गोपीचंदने आपली विजयी मोहीम कायम ठेवताना स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. गायत्रीने आपली सहकारी त्रेसा जॉलीसोबत महिला दुहेरीच्या गटात हा पल्ला गाठला. महिला दुहेरी गटाच्या अंतिम चारमधील प्रवेश निश्चित करणारी गायत्री व त्रेसा ही भारताची पहिली महिली जोडी ठरली.
भारताच्या या जोडीने उपांत्यपूर्व लढतीत कोरियाच्या दुसर्या मानांकित सोही-शिनवर 14-21, 22-20, 21-15 ने सनसनाटी विजयाची नोंद केली. या जोडीचा उपांत्य सामना चीनच्या खेळाडूंशी होणार आहेे. गायत्रीने आता दुहेरीच्या गटात उल्लेखनीय कामगिरी केली. गायत्री व त्रेसाला पहिल्या गेममध्ये सुमार खेळीचा फटका बसला. दुसर्या मानांकित जोडीने पहिला गेम जिंकून आघाडी घेतली. बिगर मानांकित जोडीने पुनरागमन करत दुसरा गेम जिंकून लढतीत बरोबरी साधली. त्यानंतर हीच लय कायम ठेवताना तिसरा गेम जिंकला.