तरुणदीप-रिद्धीने तीरंदाजीत मारली बाजी

। अंताल्या । वृत्तसंस्था ।
तिरंदाजी विश्‍वचषक स्टेज-1 च्या रिकर्व्ह मिश्र सांघिक स्पर्धेत भारताच्या तरुणदीप रॉय आणि रिद्धी फोर यांनी सुवर्णपदक जिंकले आहे. रविवारी अंटाल्या (तुर्की) येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीने ग्रेट ब्रिटनचा पराभव केला. पहिल्यांदा जोडी म्हणून खेळताना, दोन वेळचे ओलिंपियन राय आणि तरुण रिद्धी 0-2 आणि नंतर 2-4 ने पिछाडीवर होते पण भारतीय तोडीने संयम राखला 5-4 (35-37, 36-33, 39-40, 38-37). त्यानंतर शूटऑफमध्ये भारतीय जोडीने 18-17 असा विजय मिळवला.
भारतीय जोडीने सुरुवातीचा सेट 35-37 असा गमावला, परंतु ब्रिओनी पिटमन आणि अ‍ॅलेक्स वाईज या ब्रिटीश जोडीने दुसर्‍या सेटमध्ये खराब फटकेबाजी करत भारतीय खेळाडूंनी दुसरा सेट 36-33 असा जिंकला. यानंतर ब्रिटीश तिरंदाजांनी पुनरागमन करत तिसरा सेट 40-39 असा जिंकला. अंतिम सेटमध्ये चुकीचा फटका ब्रिटीश तिरंदाजांना महागात पडला, त्यामुळे भारतीय संघाने अंतिम सेट 38-37 असा जिंकला आणि सामना शूट-ऑफमध्ये आणला. शूट-ऑफमध्ये, भारतीयांनी 2-9 केले, तर ब्रिटीश खेळाडू 9 आणि 8 ठोकू शकले.

Exit mobile version