पहिली ते चौथी शाळा सुरु करण्याबाबत टास्क फोर्सचा ग्रीन सिग्नल

। मुंबई । वृत्तसंस्था ।
पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्सने ग्रीन सिग्नल दिला आहे. नियम पाळून शाळा सुरू करायला हरकत नाही, असं टास्क फोर्सचं म्हणणं आहे. लांब राहून खेळता येणार्‍या मैदानी खेळांनाही परवानगी देण्यात येईल. क्रिकेट, धावण्याची शर्यतीला परवनगी असेल. पण खो खो कब्बडीला परवानगी मिळणार नाही.
चाईल्ड टास्क फोर्सच्या बैठकीत डॉक्टरांचं एकमत झालं आहे. गतिमंद मुलांच्या शाळाही नियम पाळून सुरू करायला हरकत नसल्याचं टास्क फोर्सचं मत आहे. वस्तीगृहात राहाणार्‍यांची सुरुवातीला RTPCR टेस्ट करून त्यांना शाळेत प्रवेश देण्यात येऊ शकतो.
एखादा व्यक्ती पुन्हा बाहेर गेला, तर पुन्हा येताना RTPCR टेस्ट सक्तीची करावी. केंद्राशी बोलून लहान मुलांच्या लसीकरणाबाबत तत्परता राज्याने दाखवावी. शाळा सुरू करत लसीकरण केल्यास काहीच त्रास नसल्याचं डॉक्टरांच मत आहे. नुकताच टास्क फोर्सने आपला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे.

Exit mobile version