। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
एअर इंडिया टेकओव्हरची निविदा ही टाटा सन्सने मिळवल्याची बातमी ब्लूमबर्ग या पोर्टलने प्रकाशित केली होती. पण, ही बातमी चुकीची असल्याची माहिती केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आली आहे.
सरकारने निविदा प्रक्रियेंतर्गत टाटा सन्सला या निविदा प्रक्रियेत विजयी घोषित केल्याची माहिती ब्लूमबर्गने दिली होती. केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ इनवेस्टमेंट अॅण्ड पब्लिक इंटरेस्ट मॅनेजमेंटने एअर इंडियाची निविदा टाटा सन्सने जिंकल्याबाबतची बातमी खोटी असल्याची माहिती स्पष्ट केली. केंद्र सरकारने माध्यमांच्या बातम्यांचा दाखला देत टाटा ग्रुपने एअर इंडियाशी संबंधित आर्थिक निविदा प्रक्रियेची कोणतीही घोषणा केली नसल्याचे स्पष्ट केले. याबाबतचा निर्णय जेव्हा होईल, त्यावेळी प्रसारमाध्यमांना सांगण्यात येईल, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले. त्यामुळे माध्यमांकडून प्रसारित होणारे वृत्त खोटे असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.