टाटांची एअर इंडिया मध्ये वापसी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
उद्योग क्षेत्रातील देशातील विश्‍वसनीय टाटा समुहाने संकटात असलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडिया खरेदी करण्यासाठी बोली लावली होती. आता ही बोली टाटा कंपनीने जिंकली आहे. त्यामुळे आता एअर इंडियाची 53 वर्षानंतर लवकरच घरवापसी होणार आहे.


1932 मध्ये टाटा ग्रुपने एअरलाइन्सच्या नावाने एअर इंडियाची सुरुवात केली होती. टाटा एअरवेज या भारतातल्या पहिल्या हवाई वाहतूक करणार्‍या कंपनीचं स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीयीकरण झालं आणि एअर इंडिया असं त्याच नामांतरण झालं. सध्याच्या घडीला एअर इंडिया कर्जबाजारी झाली असून या कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. तसं मोदी सरकारने 2018 मध्येच एअर इंडिया कंपनीच्या खासगीकरणाचा प्रयत्न सुरू केला होता. पण त्यावेळी कंपनी खरेदी करण्यासाठी कोणतीच उत्सुकता दाखवली नाही. आता अनेक कंपन्या एअर इंडिया खरेदीसाठी सकारात्मक असल्याचे चित्र आहे.त्यासाठी टाटा कंपनीने देखील बोली लावली होती. आज टाटाने बोली जिंकली असून तब्बल 53 वर्षानंतर एअर इंडियाची टाटाकडे लवकरच घरवापसी होणार आहे.

एअर इंडियाची मालकी पुन्हा एकदा टाटा ग्रुपकडे आल्यामुळे आनंद झाला आहे. एअर इंडियाच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही मेहनत घेऊ. तसेच विमान उद्योगामध्ये मोठी झेप घेण्यासाठी ही चांगली संधी – रतन टाटा, उद्योगपती

Exit mobile version