तटकरे तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची बाजी

| कोलाड | वार्ताहर |

कोलाड गोवे येथील श्रीमती ग.द. तटकरे तंत्रनिकेत येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी इंटर इंजीनिअरिंग डिप्लोमा स्टुडेंट स्पोर्ट्स असोसिएशनमार्फत आयोजित केलेल्या विविध क्रीडा स्पर्धेत बाजी मारली आहे.

रसायनी येथे झालेल्या धावण्याच्या स्पर्धेत आयुष तोडकर (कॉम्प्युटर) याने 1500 मीटरमध्ये प्रथम क्रमांक, शुभम वरे (मेकॅनिकल) हाय जंप प्रथम रिलेमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. ए.आर.एम.टीई. कॉलेज शहापूर येथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विजय मिळवला आहे. स्वरस्वती विद्यालय खारगर येथे संपन्न झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत अरमान बडे, संकल्प ठाकूर, स्टीवन टेप्पो, साहिल सरकले, शुभम ठाकूर या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. रामचंद्र पॉलिटेक्निक लोणीकंद येथे पार पडलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत सिव्हिलची सानिका जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या विद्यार्थ्यांना तटकरे चॅरिटेबल ट्रस्टचे विश्‍वस्त संदीप तटकरे, रजिस्टार अजित तेलंगे, प्रा. विपुल मसाल व क्रीडा विभाग प्रमुख मनीष पाटील तसेच शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version