| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रिपेड टॅक्सी सेवेसाठी नवे भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. सुधारित मूलभूत टॅक्सी भाडे दर रु. 20.66 प्रति किलोमीटर गृहीत धरून अंतरानुसार भाडे व प्रोत्साहन टक्केवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना पारदर्शक आणि निश्चित दरांचा लाभ मिळणार आहे. तर, प्रिपेड ऑटोरिक्षा सेवेसाठी सुधारित मूलभूत ऑटोरिक्षा भाडे दर रु. 17.14 प्रति किलोमीटर गृहीत धरून अंतरानुसार भाडे व प्रोत्साहन टक्केवारी ठरविण्यात आली आहे. शासन धोरणानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रवाशी वाहतूक होणाऱ्या विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक इत्यादी ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी रिक्षा व टॅक्सी थांबे असणे गरजेचे आहे. या नव्या भाडेदरांमुळे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पारदर्शक आणि निश्चित दरांचा लाभ मिळणार असल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल यांनी सांगितले आहे.
टॅक्सी, ऑटो रिक्षाचे भाडेदर जाहीर
