। वाघ्रण । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाघ्रणला टीबी मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार 24 मार्च जागतिक क्षयरोग दूरीकरण दिनी सरपंच राजेंद्र पाटील यांना रायगड जिल्हा अधिकारी किसन जावळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना सोबत आरोग्य उपकेंद्र प्रमुख सिया पाटील, क्षयरोग दूरीकरण समिती वाघ्रण उपकेंद्र सदस्य दिपक पाटील व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी वाघ्रण सोबत चिंचवली, नारंगी, शिरवली, पेढांबे आदी ग्रामपंचायतींचा सहभाग होता. या कार्यक्रमाला तालुक्यातून विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आशा वर्कर एनएम एमपीडब्ल्यू, डॉक्टर आदी उपस्थित होते.