शिक्षक मतदारसंघ निवडणुक: मुरुडमध्ये 97.77 टक्के मतदान

Exif_JPEG_420

| आगरदांडा | प्रतिनिधी |

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीकरिता मतदान केंद्र 38 मुरुड तहसीलदार कार्यालयात सकाळी 8 वाजता मतदान प्रक्रियाला सुरुवात झाली. या मतदान प्रक्रियेत मुरूड तालुक्यातील शिक्षक 119 तर 107 शिक्षिकांनी मतदान केले. 97.77 टक्के मतदान झाले असून, आठ उमेदवाराचं भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

या निवडणुकीकरिता सूक्ष्म निरीक्षक अमोल गडाख, केंद्राध्यक्ष गोविंद कोटंबे, मतदान अधिकारी विजय महापुस्कर, मतदान अधिकारी सचिन राजे, मतदान अधिकारी निलेश भिंगारे, मतदान कर्मचारी धर्मा म्हात्रे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

महाविकास आघाडी आणि शिंदे गट असा थेट सामना पुन्हा एकदा रंगतदार आहे. कोकण मतदार संघामध्ये चुरस वाढली आहे. त्यामुळे होणार्‍या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदार संघात कोणता राजकीय पक्ष बाजी मारणार हे येत्या 2 फेब्रुवारीला मतमोजणीमधून कळणार आहे.

Exit mobile version