। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील काकळघर, कोर्लई, वेळास्ते व वावडुंगी ग्रामपंचायत निवडणुककरिता आज सकाळपासून मतदान केंद्रावर मतदानसाठी रांगा लागल्या होत्या. चार निवडणुकीकरिता ४सरपंच पदाकरीता १३सरपंच उमेदवार तर ३२सदस्य पदाकरीता ७१सदस्यपदाकरिता उमेदवार रिंगणात असुन यंदा प्रथमच थेट सरपंच पदासाठी निवडणूक झाल्यामुळे मतदारांसह उमेदवारांमध्ये ही उत्सुकता होती.मतदानकरिता महिलाचा सहभाग जास्त दिसून आला.
वावडुंगी ग्रामपंचायतकरिता मतदान ७६७, वेळास्ते ग्रामपंचायत करिता८४६,कोर्लई ग्रामपंचायत करिता १८५४ काकळघर ग्रामपंचायत करिता -१४३३ मतदाते यामध्ये स्त्री -२५२३व पुरुष २३७७ एकुण मतदान ४९०० यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला या संदर्भातील माहिती मुरुड निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार-रोहन शिंदे व निवडणूक नायब तहसीलदार -अमित पुरी यांनी दिली.तसेच मंगळवारी दिनांक २० डिसेंबरला सकाळी १० वाजल्यापासुन मुरुड तहसीलदार कार्यालया समोरील दरबार हॉलमध्ये मध्ये होणार आहे.
या सर्वांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत प्रत्येक पक्षाकडून विजेचा दावा केला असला तरी मंगळवारी दिनांक २०डिसेंबरला प्रत्यक्ष मतमोजणी नंतर मतदारांचा कौल स्पष्ट होईल. ईवीएम मशीन व्दारे मतदान घेण्यात आल्यामुळे मतदानाला फारसा वेळ लागणार नाही.
सर्व मतदान केंद्राबाहेर मुरुड पोलिस ठाण्या मार्फत कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात आला होता. पोलिस ठाण्याच्या हद्दीत मतदान शांततेत पार पडल्याची माहिती पोलिसांनी दिली.