डॉ.अनुपमा धनावडे यांना शिक्षकरत्न पुरस्कार

| नागोठणे | वार्ताहर |

शिक्षण क्षेत्रात आपले भरीव योगदान देणाऱ्या सेवांतर्गत व निवृत्त शिक्षकांचा सन्मान साहित्यसंपदातर्फे शिक्षक रत्न पुरस्काराने करण्यात येतो. 2023 सालचा शिक्षक रत्न पुरस्कार पेण येथील डॉ. अनुपमा दिलीप धनावडे ह्यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून जाहीर करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती शिक्षण घेत त्यांनी एम.फिल, पी.एच.डी पर्यंत शिक्षण त्यानी घेतले. स्वामी विवेकानंद संस्थेचे पतंगराव कदम आर्टस्‌‍ आणि कॉमर्स कॉलेज पेण येथे त्यांनी प्राचार्य म्हणून कार्यभाग सांभाळला होता. त्यांना शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version