। मुंबई । वृत्तसंस्था ।
शिक्षक भरती MPSC मार्फत करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाकडे देण्यात आला आहे. पुढे होणारी शिक्षक भरती एमपीएससीमार्फत करण्याचा शिक्षण विभागाकडून प्रयत्न केला जात आहे. यामुळे पुढे होणाऱ्या शिक्षक भरती एमपीएससी मार्फत होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र निर्णय होईपर्यंत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रिया सध्या सुरू असलेल्या पद्धतीनेच पार पडणार आहे.
नियमांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जी शिक्षक भरती सुरू आहे ती तशीच सुरु राहणार असून आगामी काळातील शिक्षक भरती एमपीएससी मार्फत घेण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून केला जाणार आहे.