| भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत कुसुंबळे हद्दीतील पिटकिरी गावच्या रहिवासी निवृत्त शिक्षिका शारदा नारायण पाटील यांचे वयाच्या 74 व्या वर्षी शुक्रवार, दि. 28 जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण पिटकिरी गावावर शोककळा पसरली. त्या प्राथमिक शिक्षिका होत्या. त्यांनी हेमनगर, वाघविरा या शाळांमध्ये 35 वर्षे सेवा केली. त्यानंतर मेढेखार येथे सेवानिवृत झाल्या. शारदा पाटील यांना नाट्य, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिकतेची आवड होती. आपल्या शैक्षणिक कारकीर्दीत अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी घडवून ते चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. त्यांच्या पार्थिवावर ज्येष्ठ नागरिक संघटना कुसुंबळे, ग्रामस्थ पिटकिरी, नाट्य मंडळ यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर उपस्थित सर्वांच्या वतीने विजय पाटील गुरुजी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात मुलगा सुधीर पाटील, सुनील पाटील, एक मुलगी रेखा, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे उत्तरकार्य दहावा ओंकारेश्वर मंदिर पेझारी येथे रविवार, दि. 7 जुलै रोजी तर तेरावे बुधवार, दि. 10 जुलै रोजी राहत्या घरी पिटकिरी येथे होणार आहेत.






