शिक्षक मतदारसंघ निवडणूक: चिरनेर केंद्रात 97. 38 टक्के मतदान

| चिरनेर | वार्ताहर |

चिरनेर येथील पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील मतदान केंद्रात 97.38% मतदान झाले. या केंद्रातील एकूण मतदान 153 होते. त्यापैकी 149 शिक्षक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात 77 पुरुष शिक्षकांनी तर 72 महिला शिक्षिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्र प्रमुख म्हणून संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार संजय खोमणे यांनी काम पाहिले. या कोकण विभाग शिक्षक मतदार संघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे समाविष्ट आहेत. या मतदार संघासाठी बाळाराम दत्तात्रेय पाटील (शेकाप माविआ) यांच्या बरोबर एकुण आठ उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद झाले आहे.

Exit mobile version