विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान- साळुंखे

पाभरे न्यू इंग्लिश स्कूलच्या नूतन इमारतीचे उदघाटन

| म्हसळा | वार्ताहर |

नुसतं शिक्षण घेऊन फायदा नाही तर या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला प्रत्येक विद्यार्थी हा सुसंस्कारीत असला पाहिजे याकडे संस्थेतील प्रत्येक गुरुजन हा मनापासून प्रयत्न करीत असतो, असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी पाभरे येथे केले.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे न्यू इंग्लिश स्कूल पाभरेच्या नूतन इमारतीचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या उदघाटन सोहळ्यास देणगीदार प्रवीणचंद्र चमनलाल शाह, वेदांत शाह रूपानी, चंदूलाल सुखलाल मेहता, कमलेशभाई मेहता, संदिप भाई शहा, मुन्नाभाई एमबीबीएस चे कलाकार बोमी धोतीवाला (सर्व राहणारे गुजरात ), रायगड भूषण कृष्णा महाडिक, स्वामी विवेकानंद संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, संजय महाजन निरीक्षक ठाणे, मुंबई, प्राचार्य तथा आजीव सेवक प्राचार्य प्रकाश हाके, रायगड चेअरमन अनिल बसवत, मझहर काजी, कृष्णा कोबनाक, शिक्षक वृंद आदि मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी आपल्या भाषणातून यांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले. समाजात अनेक मांडली खूप श्रीमंत आहेत पण त्यांच्याजवळ दातृत्व हा नसल्याकारणाने शालेय इमारती दुर्लक्षित आहेत. बापूजी साळुंखे यांनी त्यावेळी म्हणजे कोकणात रस्ते नसतानाही पाई चालत चालत केवळ ग्रामी भागातील तळागाळातील गोरगरीब कुटुंबातील मुलाला शिक्षण घेता यावं हा एकमेव उद्देश समोर ठेवला होता. त्यांच्या अथक प्रयत्नानेच डोंगराळ भागात ज्ञानमंदिरे सुरु केली असे साळुंखे यानी नमूद केले ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार या संस्थेच्या ब्रीदवाक्याप्रमाणे सर्व शाखांमधून काटेकोरपणे शिकवण दिली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी कृष्णा महाडिक यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुंदर, आणि नियोजन बद्ध असे विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक मंगेश कदम आणि त्यांचे सहकारी यांनी केले होते. शेवटी प्राचार्य हाके यांनी सर्वांचे आभार मानले.

Exit mobile version