जिल्ह्यात शिक्षकदिन उत्साहात साजरा

शारदा मंदिरात शिक्षक दिन साजरा

कर्जत शहरातील शारदा मंदिर (मराठी माध्यम) शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. डॉ. सर्वपिल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


तसेच शाळेतील इयत्ता 10 वी चे विद्यार्थी शिक्षक बनून सर्व शाळा विद्यार्थ्यांनी चालवली. या मध्ये विध्यार्थी शिक्षक, क्लार्क, शिपाई सर्व जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनी पार पाडल्या. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी मनोरंजक खेळ घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन वर्ग शिक्षिका चेतना महागडे, समिती प्रमुख विजय सावंत, शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली किसवे यांनी केले. तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी शिकवण्यासाठी मार्गदर्शन केले.

म्हसळ्यात शिक्षक दिन उत्साहात

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा म्हसळा येथे 5 सप्टेंबर शिक्षक दिन उत्साही वातावरणात संपन्न झाला. मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबू शिर्के, इंदिरा चौधरी, दिलीप शिंदे, तसेच विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका उत्तम प्रकारे पार पाडून शिक्षकांच्या मेहनतिची व कष्टाची जाणीव आपल्या सहकार्याना करून दिली.

रातवड विद्यालयात शिक्षक दिन

छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित माणगाव तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या शिक्षक दिनानिमित्ताने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव जाधव व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले.


विद्यालयाचे शिक्षक गजानन पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कार्तिकी यादव हिने केले.

शिहू येथिल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

शिक्षक दिनाचे औचित्य साधून ललिता फाउंडेशनच्या वतीने केंद्र शाळा शिहू येथिल विद्यार्थ्यांना शाळा उपयोगी वस्तूंचा वाटप करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ललिता फाउंडेशनचे पांडुरंग गदमले, के.के. कुथे, सुरेंद्र पाटील, शांताराम गदमले, कृष्णकांत म्हात्रे, नथुराम मोकल, जिवन शेळके, यशवंत गदमले, बाळाराम गदमले, एन.डी. मोकल, अनंत कांबळे, मधुकर घासे, नारायण मोकल, उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले.

सचिन अभंगे यांना पुरस्कार

कर्जत तालुक्यात असलेल्या नेरळ विद्या भवन माध्यमिक विद्यालय धामोते या मराठी माध्यमाच्या शाळेतील सहाय्यक शिक्षक सचिन अभंगे यांचा शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल आर्दश शिक्षक पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. ते गेली 21 वर्षे नेरळ विद्या भवन शाळेत अध्यापनाचे कार्य करीत आहेत.


कोल्हापूर येथील आनंदगंगा फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने राज्यातील आदर्श शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी आनंदगंगा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तानाजी पवार, निलेश साळोखे, सुनिल एडके, सुनील एडके, विनायक भोसले, संजय घोडावत, सतिश घाटगे उपस्थित होते.

प्रदीप पवार यांचा सन्मान

कोल्हापूरच्या आनंदगंगा फाऊंडेशनतर्फे पोलादपूर तालुक्यातील धारवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप राजाराम पवार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार-2023 मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला.


संजय घोडावत पॉलीटेक्निक युनिव्हर्सिटी अतिग्रे, कोल्हापूर येथे 3 सप्टेंबर रोजी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदिप पवार यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आले. यावेळी याप्रसंगी आनंदगंगा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तानाजी पवार, निलेश साळोखे, सुनिल एडके, सुनील एडके, विनायक भोसले, संजय घोडावत, सतिश घाटगे उपस्थित होते.

Exit mobile version