शिक्षकांची आझाद मैदानावर धडक

| पनवेल | वार्ताहर |
विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी मनपा,नपामधील शिक्षक संघटनांनी आझाद मैदानावर शुक्रवारी एक दिवसाते लाक्षणिक उपोषण केले. यामध्ये रायगडातील शिक्षक संघटनाही सहभागी झालेल्या होत्या. राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका मधील शिक्षकांच्या विविध समस्या कडे नगरविकास विभाग दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे याकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाने आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण केले. त्यातूनच त्यांनी सत्ताधार्‍यांना मुंबई येथील आझाद मैदानात आपली ताकद दाखवून दिली.

रायगड मधील शिक्षक संघाचे पदाधिकारी वैभव पाटील, ज्योत्सना भरडा, प्रमोद लांगी यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो शिक्षक तर राज्यभरातील जवळपास पाच हजार शिक्षक या धरणे आंदोलनात सहभागी झाले.राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांना शंभर वेतन मिळालाच पाहिजे, शिक्षकांना जुनी पेंशन लागू करावी, जिल्हा परिषद शिक्षकांप्रमाणे ऑनलाईन बदली पोर्टल सुरू करावे, नगरविकास विभागाने नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांसाठी स्वतंत्र शिक्षण विभाग स्थापन करावा, शहर पातळीवर केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यासारखी पदे निर्माण करून नपा व मनपाच्या शिक्षकांना पदोन्नती द्यावी आदी मागण्या या शिक्षक महासंघाने शासनाकडे केल्या आहेत. मात्र त्यांच्या मागण्या विचारात घेतल्या जात नसल्याने महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाने आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले असल्याची माहिती शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी दिली.

Exit mobile version