टीम इंडियाची घोषणा

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकांसाठी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका महिला संघ जून 2024 मध्ये भारतीय दौर्‍यावर येणार आहे. या दौर्‍यात दोन्ही महिला संघात वनडे, टी आणि कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौर्‍यासाठी भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधारपद स्मृती मानधनाकडे आहे. तसेच तिन्ही क्रिकेट मालिकांसाठी जेमिमाह रोड्रिग्स आणि पुजा वस्त्राकर यांचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यान दुखातपतग्रस्त झालेल्या यास्तिका भाटीयाच्या जागेवर यष्टीरक्षक फलंदाज उमा छेत्रीला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे तिला आता आंतरराष्ट्रीय पदार्णाची संधी असणार आहे. त्याचबरोबर प्रिया पुनिया आणि अरुंधती रेड्डी यांचे संघाच पुनरागमन झाले आहे.दक्षिण आफ्रिकेचा हा भारत दौरा 13 जून पासून सुरुवात होणार असून 9 जुलै रोजी संपणार आहे. 13 जूनला दक्षिण आफ्रिका सराव सामना खेळेल, त्यानंतर 16 ते 23 जून दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका होईल, तर 28 जून ते 1 जुलै दरम्यान एकमेव कसोटी सामना होईल, तर 6 ते 9 जुलै दरम्यान टी मालिका खेळवली जाईल.

वनडे मालिकेसाठी संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स , ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), दयालन हेमलथा, राधा यादव, आशा शोभना, श्रेयंका पाटील, सायका इशाक, पूजा वस्त्रकार, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, प्रिया पुनिया.
कसोटी सामन्यासाठी संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, शुभा सतीश, जेमिमाह रॉड्रिग्स , ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, सायका इशाक, राजेश्‍वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर , अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, प्रिया पुनिया.
टी 20 मालिकेसाठी संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दयालन हेमलता, उमा छेत्री (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स , सजना सजीवन, दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, राधा यादव, अमनजोत कौर, आशा शोभना, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी राखीव खेळाडू - सायका इशाक.
दक्षिण आफ्रिका महिला संघाचा भारत दौरा
वनडे मालिका -16 जून - पहिला वनडे सामना, बेंगळुरू (वेळ - दु. 1.30 वाजता)19 जून - दुसरा वनडे सामना, बेंगळुरू (वेळ - दु. 1.30 वाजता)23 जून - तिसरा वनडे सामना, बेंगळुरू (वेळ - दु. 1.30 वाजता) कसोटी सामना -28 जून ते 1 जुलै -चेन्नई (वेळ - स. 9.30 वाजता)
टी 20 मालिका जुलै - पहिला टी सामना, चेन्नई (वेळ - संध्या. 7.00 वाजता)7 जुलै - दुसरा टी सामना, चेन्नई (वेळ - संध्या. 7.00 वाजता)9 जुलै - तिसरा टी सामना, चेन्नई (वेळ - संध्या. 7.00 वाजता)
Exit mobile version