टीम इंडिया टी- 20 मालिकेसाठी सज्ज

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

क्रिकेट चाहत्यांना आयपीएलसह वुमन्स टीम इंडियाच्या टी 20 मालिकेचा थरार अनुभवता येणार आहे. वुमन्स टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 5 टी 20 सामने खेळवणार आहे. टीम इंडिया या टी 20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.

या मालिकेत हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर स्मृती मंधाना हीच्याकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी आहे. तर लॉरा वॉल्वॉर्ड्ट हिच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. टी 20 क्रिकेटच्या इतिहासात वुमन्स टीम इंडियाच दक्षिण आफ्रिकेवर वरचढ असल्याचं आकड्यातून स्पष्ट होतं. उभयसंघात आतापर्यंत एकूण 19 टी 20 सामने झाल आहेत. टीम इंडियाने त्यापैकी 10 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने 6 वेळा विजय मिळवला आहे. तर उभयसंघातील 3 सामन्यांचा निकाल लागला नाही. त्यामुळे आता टीम इंडिया या मालिकेत विजयी सलामी देणार की यजमान अपेक्षित सुरुवात करत खातं उघडणार? यासाठी निकालाची वाट पाहावी लागणार आहे.

Exit mobile version