भारतीय संघ भिडणार प्राईम मिनीस्टर 11 बरोबर

| सिडनी | वृत्तसंस्था |

भारतीय संघाचा या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. उभयसंघात एकूण 2 महिने 5 कसोटी सामन्यांची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. या मालिकेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये एका डे नाईट सामन्याचा समावेश आहे.

भारताची ऑस्ट्रेलिया विरुद्ध दिवस रात्र सामन्यात निराशाजनक कामगिरी राहिली आहे. मात्र यंदा तसे काही होऊ नये, म्हणून खबरदारी घेत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. टीम इंडिया 2020-21 नंतर पहिल्यांदा कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. मात्र टीम इंडियाची गेल्या दौऱ्यातील डे नाईट मॅचमधील कामगिरी ही फारच निराशाजनक राहिली होती. ॲडलेडमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव हा अवघ्या 36 धावांवर आटोपला होता. मात्र भारताने त्यानंतर दणक्यात कमबॅक करत अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात ती मालिका जिंकून इतिहास रचला होता. मात्र, यंदा तसे काही होऊ नये म्हणून डे नाईट मॅचआधी उभयसंघात 2 दिवसांची डे-नाईट प्रॅक्टिस मॅच खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


Exit mobile version