टीम इंडियाचा घरच्या मैदानात व्यस्त कार्यक्रम

| मुंबई । वृत्तसंस्था ।

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2023 मध्ये होणार्‍या देशांतर्गत मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. हे वेळापत्रक पाहता भारतीय संघाच्या खेळाडूंना श्‍वास घेण्यासही वेळ मिळणार नाही इतक्या मालिका होणार आहेत. तर सोबतच क्रिकेट प्रेमींसाठी हे सर्व सामने पर्वणी ठरणार आहेत. टीम इंडियाला पुढील वर्षी श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यांसाठी भारताला यजमानपद भूषवायचे आहे.

हे सामने 3 जानेवारी पासून सुरू होतील. श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. यानंतर 18 जानेवारी पासून न्यूझीलंडविरुद्ध तीन वनडे आणि तीन टी-20 सामने होणार आहेत. ऑस्ट्रेलिया सोबत पहिली चार सामन्यांची कसोटी मालिका 9 फेब्रुवारी पासून खेळली जाईल, त्यानंतर 17 मार्चपासून तीन एकदिवसीय सामने खेळले जातील.

जानेवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेने सुरू होईल. खाली पाहूया सविस्तर वेळापत्रक.

भारत विरुद्ध श्रीलंका
03 जानेवारी – पहिला टी-20 सामना – मुंबई
05 जानेवारी – दुसरा टी-20 सामना – पुणे
07 जानेवारी – तिसरा टी-20 सामना – राजकोट
10 जानेवारी – पहिला एकदिवसीय सामना – गुवाहाटी
12 जानेवारी – दुसरा एकदिवसीय सामना – कोलकाता
15 जानेवारी – तिसरा एकदिवसीय सामना – त्रिवेंद्रम

त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेकडे वळेल. ज्यात हैदराबाद, रायपूर आणि इंदूरमध्ये हे सामने खेळवले जातील. 21 जानेवारी रोजी होणारा दुसरा एकदिवसीय सामना रायपूर शहरासाठी एक व्होल्टेज वनडे सामना असेल कारण ते रायपूरमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड
18 जानेवारी – पहिला एकदिवसीय सामना – हैदराबाद
21 जानेवारी – दुसरा एकदिवसीय सामना – रायपूर
24 जानेवारी – तिसरा एकदिवसीय सामना – इंदूर
27 जानेवारी – पहिला टी-20 सामना – रांची
29 जानेवारी – दुसरा टी-20 सामना – लखनऊ
01 फेब्रुवारी – तिसरा टी-20 सामना – अहमदाबाद

09 फेब्रुवारीपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका 9 फेब्रुवारी ते 13 मार्च या कालावधीत होणार असून त्यात नागपूर, दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथे सामने खेळवले जाणार आहेत. कसोटी मालिका जागतिक चॅम्पियनशिप हंगामाचा भाग असेल. बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेचा हा शेवटचा हंगाम असेल, ज्यामध्ये चार सामने खेळवले जातील.

09 ते 13 फेब्रुवारी – पहिला कसोटी सामना – नागपूर
17 ते 21 फेब्रुवारी – दुसरा कसोटी सामना – दिल्ली
01 ते 05 मार्च – तिसरा कसोटी सामना – धर्मशाला
09 ते 13 मार्च – चौथा कसोटी सामना – अहमदाबाद

17 मार्च – पहिला एकदिवसीय सामना – मुंबई
19 मार्च – दुसरा एकदिवसीय सामना – वायझॅग
22 मार्च – तिसरा एकदिवसीय सामना – चेन्नई

Exit mobile version