| तळा | वार्ताहर |
यंदा महाराष्ट्राचे शास्त्रीय नृत्याचा मान नाशिकच्या नृत्यांगण संस्थेच्या गुरू कीर्ती भवाळकर यांच्या आठ कथकाच्या विद्यार्थिनींना मिळाला. त्या नारीशक्ती आणि विकसित भारत या संकल्पनेवर कथक नृत्य सादर केले. कर्तव्यपथावर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्रपती तसेच इतर मान्यवरांचे समोर कथक सेवा सादर करण्यात आली.
या पथकात आठ विद्यार्थीनी होत्या त्यात तेजल जयश्री संजय मांडवकर हिचा या मध्ये समावेश होता. ती गोखले एज्युकेशन सोसायटी संचालित सपट अभियांत्रिकी महाविद्यालय नाशिक येथे उच्च शिक्षण घेत आहे. तिला ही संधी मिळाली त्यामुळे तिचे सर्व स्तरातून, ज्ञाती बांधवांकडून, समाज बांधव, रायगड जिल्हा शिंपी समाज, कोकण विभाग ना. स. परिषद, नामदेव हितवर्धक मासिक परिवार या सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा मिळत आहेत.