टेमघर ते वरदायनी रस्त्याचे झाले लोकार्पण

माजी आमदार पंडीत पाटील यांच्या हस्ते संपन्न

| चणेरा | प्रतिनिधी |

खांबेरे ग्रामपंचायत हद्दीतील टेमघर गावातील वरदायनी मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला माजी आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. हे काम आमदार जयंत पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आले. याप्रसंगी बोलताना शेकाप नेते पंडित पाटील यांनी विद्यमान लोकप्रतिनिधी साडे चार वर्षात विकासकामे करण्यास अपयशी ठरल्याची घणाघाती टिका केली.

जनतेसाठी पायाभूत व भौतिक सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाचा निधी आणणे हे लोकप्रतिनिधीचे महत्वाचे काम असते. पण मुदत संपण्यास काही महिने राहिले आहेत. तरी देखील चणेरा भागात विकासकामे झालेली नाहीत. अशा शब्दात पंडित पाटील यांनी नाव न घेता विद्यमान लोकप्रतिनिधी वर टीकास्त्र सोडले. तर वरदायनी मंदिराचे स्लॅब गलती थांबविण्यासाठी पत्र्याची शेेड साधून देण्याचे आश्‍वासन दिले. तसे खांबेरे ग्रामपंचायत तालुक्यातील पहीली ग्रामपंचायत आहे की त्यामध्ये 13 गावे, वाड्या वस्तीमध्ये 175 सोलर दिवे, 6 हाय मॅक्स लावण्यात येणार आहेत . त्यातील बॅटरी , सोलर पॅनल कोणी नादुरुस्त करणार नाही या कडे ग्रामस्थांनी लक्ष दिले पाहिजे असे पत्रकार जितेंद्र जोशी म्हणाले. पंडीत पाटील यांचा रोखठोकपणा आम्हाला आवडतो ते शहाळ्याप्रमाणे आहेत बाहेरून कडक तर आतुन मऊ असे रोहा कार्यालयीन चिटणीस संदेश विचारे म्हणाले. या कार्यक्रमाला विद्यमान सरपंच खांबेरे आतिष मोरे, विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष गोपीनाथ गंभे, कार्यालयीन चिटणीस रोहा संदेश विचारे, लियाकत खोत, अमोल शिंगरे, काशिनाथ भोईर, मुंबईकर मंडळ, महीला व ग्रामस्थ उपस्थित होते .

Exit mobile version