मंदिराचा वर्धापनदिन साजरा

| खांब | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील खांब पंचक्रोशीतील वैजनाथ येथील श्री.विठ्ठल-रूख्मिणी मंदिराचा 28 वा वर्धापनदिन सोहळा (दि.29) फेब्रुवारी मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. वै.गुरूवर्य अलिबागकर बाबा गोपाळ बाबा वाजे धोंडूबाबा कोलाटकर यांच्या कृपार्शिर्वादाने व ह.भ.प.दत्तूमहाराज कोलाटकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपन्न करण्यात आलेल्या या वर्धापनदिन सोहळ्याप्रसंगी स.8 वाद.देवतांना अभिषेक, ह.भ.प.सहादेव घरट यांच्या हस्ते कळशपूजन, 9 ते 12 ह.भ.प.दत्तूमहाराज कोलाटकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे 9 व 12 व्या अध्यायाचे पारायण, 12 ते 1 उपसरपंच दत्तात्रेय वातेरे यांच्या सौजन्याने महाप्रसाद, सायं.4 ते 5 ह.भ.प.टोंगळे गुरूजी यांची प्रवचनरूपी सेवा, 6 ते 7 खांब पंचक्रोशी वारकरी संप्रदाय यांचे सामुदायिक हरिपाठ, 8 ते 9 ग्रामस्थ मंडळाचे वतीने महाप्रसाद, 9 ते 11 ह.भ.प.मारूती महाराज कोलाटकर यांची हरिकिर्तनरुपी सेवा तद्नंतर जागर भजन आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न करण्यात आले.

Exit mobile version