सुदैवाने वाहनचालक बालंबाल बचावला
| कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाडकडून मुंबईकडे जाणारा टेम्पो (एम.एच.06 बी.डी. 3132) हा धरणाची वाडी येथील रस्त्याच्या बाजूला पलटी झाल्याने हा अपघात झाला आहे, सुदैवाने वाहनचालक बालंबाल बचावला आहे.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेली 16 वर्षांपासून सुरु असून, या महामार्गाच्या साईडपट्ट्यांचे काम एवढे निकृष्ठ दर्जाचे आहे, हे या अपघातावरून दिसून येते. कारण, महाडकडून मुंबईकडे जाणारा टेम्पो धरणाची वाडी येथील वळणावर आला असता टेम्पोची चाके मातीत रुतून तो पटली झाला. सुदैवाने वाहनचालक बचावला आहे.