मुरुड-अलिबाग मार्गावर टेम्पोचा अपघात

। मुरुड । वार्ताहर ।

मुरुड-अलिबाग मार्गावर सर्वे उतारावर टेम्पोला अपघात झाला आहे. हा अपघात रस्ता खचल्यामुळे झाला असल्याची माहिती मिळत आहे. या सर्वे उतारात रस्त्याचा काही भाग खचला असल्याने येणाऱ्या वाहनांचा तोल जातो. त्यामुळे वाहनचालकांचा वाहनावरील ताबा सुटून अपघात होत आहेत. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी, अशी मागणी प्रवासी व वाहनचालक करत आहेत.

Exit mobile version