। खोपोली । प्रतिनिधी ।
आठ वर्षांपूर्वी संस्थेची धुरा संतोष जंगम यांच्या नेतृत्वाखाली हातात घेतली तेव्हा संस्थेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. आडचणीच्या काळात कोणतीही बँक कर्ज देण्यासाठी तयार नव्हती. माजी आ. जयंत पाटील यांनी बँकेतून कर्ज दिल्यानंतर संस्थेची परिस्थिती सुधारली. त्यानंतर आज सर्व शाळांचा चेहरामोहरा बदलून टाकत आहोत हे करीत असताना कोणत्याही संचालकाचा स्वार्थ नसल्याचे केटीएसपी मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील यांनी सांगत संस्थेचे माजी अध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. मसुरकर यांचा अनुभव प्रदिर्घ असल्याने आम्ही संस्थेचे कसं काम करतोय, यावर त्यांचे बारीक लक्ष आहे, असेही पाटील यांंनी सांगितले. ते पं.पू. गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात बोलत होते.
पं.पू.गगनगिरी महाराज इंटरनँशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंम्मेल मोठ्या दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चाँईस ग्रुप आँफ कंपनीचे डायरेक्टर धमेंद्र करीया, अॅक्टर नितीन शर्मा उपस्थित होते, तर संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष अबू जळगांवकर,कार्यवाह किशोर पाटील,संचालक दत्ताजीराव मसुरकर, राजू अभाणी, नरेंद्र शहा, राजू ठक्कर, भास्कर लांडगे, शैलेश विठलाणी, अभय तन्ना यांच्याह विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेचे अध्यक्ष दिनेश गुरव, प्राचार्य गौरव तिवारी यांनी केले.
खोपोलीत सीबीएससी शाळा सुरू करण्याचे मोठे स्वप्न होते, ते पूर्ण करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व संचालकांनी साथ दिल्यामुळेच आज शाळा उभी राहिली असून, शाळेत 650 तर ज्यु कॉलेजमध्ये 250 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सीबीएससी शाळेला मान्यता मिळविण्यासाठी अडचणी असतात, परंतु आमचे मार्गदर्शन शेकापक्षाचे नेते माजी आ.जयंत पाटील यांची मोलाची मदत मिळाल्यामुळे शाळेला मान्यता मिळाल्याचे शाळेचे अध्यक्ष दिनेश गुरव यांनी प्रास्ताविकातून सांगितले.
खोपोली शहरात एवढी मोठी शाळा उभी आहे याचे सार्थ अभिमान असल्याचे प्रमुख पाहुणे चॉईस ग्रुप ऑफ कंपनीचे डायरेक्टर धमेंद्र करीया यांनी बोलताना सांगत संस्थेचे संचालक, प्राचार्य यांचे कौतुक केले. पं.पू.गगनगिरी महाराज इंटरनेशनल स्कूलला मान्यता मिळवून देण्यासाठी शाळेचे अध्यक्ष दिनेश गुरव, प्राचार्य गौरव तिवारी, अमृता जोशी यांच्यासह शिक्षकांची मोठी मेहनत असून, पालकांनीही विश्वास टाकत मुलांना प्रवेश घेतल्याबद्दल कार्यवाह किशोर पाटील यांनी आभार व्यक्त केले.