कशेळे येथे दुचाकीला टेम्पोची धडक

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर कशेळे येथे शनिवारी (दि.27) सकाळी टेम्पोची दुचाकीला धडक लागून अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वाराला किरकोळ दुखापत झाली आहे.

सावळे गावातील तरुण दुचाकी (एमएच-46-बीवाय-2940) घेउन कशेळे बाजाराकडे जात होते. त्‍याच दरम्यान मुरबाड रस्त्याने लोखंडी पत्रे घेउन निघालेला वांगणी गावातील टेम्पो चालकाचा कशेळेजवळ ताबा सुटल्याने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून दुचाकी चालक देखील जखम झाला आहे. जखमी दुचाकी चालकाला तत्काळ कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तरुणाला किरकोळ जखमा झाल्याने कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आलेली नाही.

Exit mobile version