मुंबई-गोवा महामार्गावर टेम्पोला अपघात

| गोव-कोलाड | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड येथील शिवनेरी मंगल कार्यालयासमोर वळण घेण्याच्या नादात टेम्पो गटारात जाऊन विचित्र अपघात झाला. सुदैवाने टेम्पो चालक बचावला. गेली पंधरा वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असून अद्याप कोलाडमध्ये हे काम सुरु झालले नाही. शिवाय रस्त्याच्या बाजूला असणारे गटाराचे कामदेखील अर्धवट स्थितीत असून कोलाड येथील शिवनेरी मंगल कार्यालयाबाजूला असणाऱ्या पोस्ट ऑफिससमोर अनेक वर्षांपासून मोठे गटार खोदून ठेवले असून त्याचे कामदेखील रखडले आहे. या गटारात गतवर्षी एक दुचाकीस्वार पडून जखमी झाला होता. पोस्ट ऑफिसमध्ये नागरिकांना जाण्यासाठी जागा नसल्याने नागरिकांना या गटाराच्या बाजूनी जावे लागते. जर तोल गेला तर मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Exit mobile version