एसटीतील दहा कर्मचारी सेवानिवृत्त

। हमरापूर । वार्ताहर ।

पेण-रामवाडी येथील एसटी महामंडळाच्या रायगड विभागीय कार्यशाळेतील कर्मचारी अनिल दरेकर यांच्यासह दहा जण सेवा निवृत्त झाले. रामवाडी येथील विभागीय कार्यालयात यानिमित्त निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास विभाग नियंत्रक दीपक घोडे, एसटीचे अधिकारी कांबळे, विलास खोपडे, विजय केळकर, जी.एम. पाटील, निवृत्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

एसटीतील आपल्या 38 वर्षाचा सेवेनंतर अनिल दरेकर विभागीय कार्यशाळा पेण, मुस्ताक तांडेल, हनुमंत मोहिते, कुमार बापट अलिबाग, अब्दुल करीम खतीब, रोहा, जयप्रकाश म्हात्रे अलिबाग, प्रसन्न पाटील अलिबाग, संदीप पाटील अलिबाग हे आज सेवानिवृत्त झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना कृष्णकांत दरेकर यांनी आज हे सर्व कर्मचारी आपल्या नोकरीच्या कालावधी पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे भविष्यात त्यांना व इतर सर्वाना पुढील वाटचालीसाठी सुयश चिंतले. रामवाडी विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा नीटनेटकेपणा उपस्थित असणार्‍या मान्यवरांसमोर मांडला. आज जे सेवा निवृत्त होतं त्या सर्वांनी एसटीमध्ये चांगले काम केले त्या सर्वांची उणीव नक्की जाणवेल. एस.टी.महामंडळाच्या योजनाबद्दल देखिल यावेळी विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी सविस्तर माहिती उपस्थितांना सांगितली.

Exit mobile version