चिंचवण शाळेच्या नवीन इमारतीस दहा लाखांचा निधी मंजूर

। उरण । वार्ताहर ।
माजी आमदार विवेक पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राजपत्रित जिल्हा नियोजन समिती सदस्य माजी सभापती काशिनाथ पाटील यांच्या माध्यमातून रा.जि.प. शाळा चिंचवणच्या नवीन इमारत बांधकामासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यावेळी शेकापचे तालुका चिटणीस माजी उपसभापती राजेश केणी, शेकापचे पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष व देवळोली ग्रामपंचायत सदस्य देवा पाटील, पनवेल पंचायत समितीचे इंजिनिअर मटकर, सांगुर्ली ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पद्माकर कातकरी, उपसरपंच वसंत पाटील, जमाजी उपसरपंच सचिन खुटले, ज्यांनी या निधीसाठी पाठपुरावा केला ते पुरोगामी युवक संघटनेचे पनवेल तालुका उपाध्यक्ष अमित भोईर, सुकापुर येथील शेकापचे युवा नेते अमित म्हात्रे, चिंचवण पोलीस पाटील दिलीप खुटले, उद्योजक सुनील म्हसकर, मा सदस्य जगदीश पाटील, शेकाप युवा नेते राम पाटील, काशिनाथ भोईर, काशिनाथ खुटले, भाऊ घरत, हरिश्‍चंद्र पोपेटा, महेश भोईर, परशुराम भोईर, सूरज घरत, दीपक म्हात्रे, मुख्याध्यापक सारिका साळुंखे, उपमुख्याध्यापक मथुरा जाधव, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा संजीवनी घरत तसेच ग्रामशिक्षण समिती सदस्य महिला, ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.

Exit mobile version