| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहा नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. घटनास्थळावरून सर्वांचे मृतदेह आणि तीन स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. कोंटा आणि किस्टाराम एरिया कमिटीच्या नक्षलवाद्यांसोबत डीआरएफ आणि सीआरपीएफ यांच्यात दंतेसपुरम, कोराजुगुडा, भेज्जीच्या नागरामच्या जंगलात चकमक झाली. परिसरात शोध सुरू आहे. यावर्षी 1 जानेवारी ते 22 नोव्हेंबरपर्यंत 207 नक्षलवादी मारले गेले आहेत. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी सांगितले की, या चकमकीत एके-47, इन्सास आणि एसएलआर आणि इतर शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी हे मोठे यश असल्याचे सांगितले.