जिल्हा परिषदेचे दहा कार्यालये कुंटे बागेत स्थलांतरीत

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग येथील जिल्हा परिषदेची इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे या इमारतीचे वेगवेगळे कार्यालय अन्य ठिकाणी हालविण्यात आले आहेत. अलिबाग येथील कुंटेबाग या ठिकाणी दहा कार्यालये हालविण्यात आले आहेत. तर उर्वरित कार्यालये अन्य ठिकाणी हालविण्याच्या हालचाली वेग धरू लागल्या आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या पुढाकाराने अलिबागच्या मध्यवर्ती ठिकाणी रायगड जिल्हा परिषद इमारत गेल्या काही वर्षापुर्वी बांधण्यात आली. शिवतिर्थ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीचे वर्षभरापुर्वी स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले.

यामध्ये तातडीने कार्यालये हालविण्याचे सुचना करण्यात आल्या. त्यानुसार जिल्हा परिषदेमधील वेगवेगळी कार्यालय अन्य जागेत हालविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अलिबाग शहरातील कुंट्याची बाग येथील जिल्हा परिषद सभापती व जिल्हा परिषद अधिकारी वसाहतीमध्ये काही कार्यालये हालविण्यात आली आहेत. त्यामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा व पाणी स्वच्छता मिशन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियान कक्ष, यांत्रिकी उपअभियंता तसेच सामान्य प्रशासन, समाजकल्याण विभाग, महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागाचा काही भाग तसेच सामान्य प्रशासन, समाजकल्याण विभाग, महिला व बालकल्याण विभाग कुंटेबाग या ठिकाणी हालविण्यात आला आहे. या कुंटेबागमध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व बांधकाम विभागाचे कार्यालय असणार आहे. त्याची दुरुस्तीचे काम वेगात सुुरू आहे. प्राथमिक व शिक्षण विभाग अलिबाग पंचायत समितीच्या वरच्या मजल्यावर हालविले आहे. आरोग्य विभागाचा काही भाग एनआरएचएम विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीजवळ हालविला आहे. जिल्हा परिषदेमधील अर्थ विभाग जिल्हा टपाल कार्यालयासमोर महिला बाल विकास विभागाच्या मागील इमारतीमध्ये हालविले जाणार आहे.

Exit mobile version