विश्‍वचषकासाठी दहा संघ पात्र

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतात होणार्‍या विश्‍वचषकात खेळणारे दहा संघ निश्‍चित झाले आहेत. श्रीलंका आणि नेदरलँड या दोन संघांनी क्वालिफायरमधून प्रवेश मिळवला आहे. भारतासह इतर आठ संघ थेट पात्र ठरले होते. काही दिवसांपूर्वी आयसीसीने वेळापत्रक जारी केले होते, त्यामध्ये क्वालिफायर 1 आणि क्वालिफायर 2 हे संघ निश्‍चित नव्हते. आता हे दोन्ही संघ निश्‍चित झाले आहेत.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर विश्‍वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना रंगणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या सामन्याने विश्‍वचषकाची सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबर रोजी होणारा फायनल सामनाही अहमदाबाद येथील स्टेडिअवर होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चेन्नईच्या मैदानात सामना रंगणार आहे.

Exit mobile version