पेण येथे टेनिसबॉल क्रिकेट निवड चाचणी स्पर्धा

| पाली | वार्ताहर |

ट्रॉफी फाईटर्स फाऊंडेशन व रायगड जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वरिष्ठ गट (सिनिअर) व सब ज्युनिअर मुले व मुली यांची रायगड जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट निवड चाचणी स्पर्धा प्रायव्हेट हायस्कूल पेण मैदान, रायगड येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

या स्पर्धेचे उद्घाटन जि.प.चे माजी सदस्य प्रभाकर म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटनेचे संस्थापक क्रीडा महर्षी स्व. संतोष गुरव यांना श्रद्धांजली वाहून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त व संघटनेचे सचिव संदीप प्रल्हाद गुरव, ट्रॉफी फाईटर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधाकर म्हात्रे, टेनिसबॉल क्रिकेट असो.चे उपाध्यक्ष किरण पाटील, टेक्नि. डायरेक्टर भरत गुरव, रायगड भूषण पुरस्कार प्राप्त रत्नाकर ठाकूर, ट्रॉफी फा. फाऊंडेशनचे पदाधिकारी महेश म्हात्रे, सुशील म्हात्रे, नरेश म्हात्रे, विनायक म्हात्रे, दिपक पाटील, जयदीप पाटील, दत्ता म्हात्रे, मानसी म्हात्रे, तृप्ती म्हात्रे आदी मान्यवरांसह खेळाडू व नागरिक उपस्थित होते.

या निवड चाचणी स्पर्धेतून निवडलेला रायगडचा संघ खालील प्रमाणे:-
वरिष्ठ गट (सिनिअर) मुले –
निहार म्हात्रे (कॅप्टन), तुषार म्हात्रे, सचिन म्हात्रे, कुणाल निकम, राजा निसाद, शुभम म्हात्रे, अनुप पाटील, शंतनू परब, हर्षल म्हात्रे, आदित्य गदमले, सोहम म्हात्रे, राज पाटील, पियुष माळी, विशाल मालुसरे.
सब ज्युनिअर गट – हर्ष म्हात्रे, अनुज पाटील, अर्याश पाटील, स्मित म्हात्रे, आशिष म्हात्रे, पार्थ वैशंपायन, जतीन पाटील, रिधम पाटील, सिद्धांत गुरव.
टीम प्रशिक्षक – महेश म्हात्रे, टीम व्यस्थापक – भरत गुरव.

हा निवडलेला रायगडचा संघ परभणी, प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे होणार्‍या सातव्या सिनिअर व सहाव्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेतून निवडलेले खेळाडू जम्मू-काश्मीर येथे दि. 8 ते 11 डिसेंबर रोजी होणार्‍या राष्ट्रीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतील.

Exit mobile version