टेनिसपटू लिएंडर पेस, अभिनेत्री नफीसा अली तृणमूलमध्ये

पणजी | वृत्तसंस्था |
टेनिसच्या जगतातील प्रसिद्ध खेळाडू लिएंडर पेस, अभिनेत्री आणि माजी काँग्रेस नेत्या नफीसा अली आणि मृणालिनी देशप्रभू यांनी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत गोव्यात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
लिएन्डर पेस यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतल्याचं सांगताना आनंद होत आहे, असं म्हणत यावेळी ममता बॅनर्जी यांनी पेस यांचं पक्षात स्वागत केलं. लिएन्डर पेस यांच्यापूर्वी अभिनेत्री आणि माजी काँग्रेस नेत्या नफीसा अली आणि मृणालिनी देशप्रभू यांनीही औपचारिकरित्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नफीसा अली यांनी 2009 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी त्यांनी सपाच्या तिकिटावर लखनऊ मतदारसंघातून लोकसभा निवडणूकही लढवली होती.

Exit mobile version