कोलाडमध्ये भटक्या कुत्र्यांची दशहत

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा हायवे वरील कोलाड आंबेवाडी नाका येथील बाजारपेठेच्या ठिकाणी दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून या भटक्या कुत्र्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी यांच्या सह टुव्हीलर स्वार यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

मुंबई-गोवा हायवे वरील कोलाड हे ठिकाण बाजारपेठेचे मध्यवर्ती ठिकाण असून येथे आजूबाजूच्या 60 ते 65 खेडेगावातील नागरिक बाजाराकरिता ये-जा करीत असतात. तसेच या परिसरात शाळा, कॉलेज असल्यामुळे हजारो विद्यार्थी ही ये-जा करीत असतात. यातच या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी एकमेकांच्या मागे सैरावैरा पळत असतात व टुव्हीलरस्वार यांच्या समोर येऊन धडकत असल्यामुळे चालक जखमी होत आहेत. यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.

Exit mobile version