भीषण अपघात! केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून ६ जणांचा मृत्यू

। उत्तराखंड । वृत्तसंस्था ।

केदारनाथ येथे हेलीकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली. सकाळच्या सुमारास एक खासगी हेलिकॉप्टर केदारनाथ जवळ कोसळलं. आर्यन कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं, अशी माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सहा जण हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेत. एकूण आठ भाविक या हेलिकॉप्टरमध्ये होते, असं सांगितलं जातंय.

उत्तराखंडच्या केदारनाथपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हे हेलिकॉप्टर कोसळलं. मदतकार्यासाठी पथके रवाना झाली आहेत. केदारनाथमध्ये दाट धुके असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाला असा अंदाज बांधण्यात येत आहे. हेलिकॉप्टर संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे.

Exit mobile version