अपघातात स्कुटी चालकाचा मृत्यू, दोन जखमी
। उरण । वार्ताहर ।
गव्हाण फाटा ते चिरनेर रस्त्यावरुन बाँयलर कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोची स्कुटी चालकाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात स्कुटी चालक वैभव म्हात्रे ( रा.हाशिवरे – अलिबाग) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर टेम्पो चालक व त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघात हा रविवारी ( दि ९ )सकाळी ६ च्या सुमारास टाकी गावच्या बस स्थानका जवळ घडला आहे.
गव्हाण फाटा ते चिरनेर रस्त्यावरुन खारपाडा दिशेने बाँयलर कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोनी चिरनेरच्या दिशेने येणाऱ्या स्कुटी चालकाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कुटी चालक वैभव म्हात्रे ( रा.हाशिवरे -अलिबाग) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सदर टेम्पो चालक सलिम हुसेन व त्यांचा साथीदार अब्दुल शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात हा रविवारी (दि९) सकाळी ठिक ६-१५ च्या सुमारास घडला आहे.
या अपघाताची माहिती उरण पोलिसांना मिळताच पोलिसांनी सदर अपघात ग्रस्तांना या परिसरातील नागरिकांच्या मदतीने उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताची माहिती उरण वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी आपल्या कर्मचारी वर्गाला पाठवून वाहतूक कोंडी ची समस्या उद्भवणार नाही याची खबरदारी घेतली आहे.सदर अपघाता संदर्भात उरण पोलीस अधिक तपास करत आहेत.