| उरण | वार्ताहर |
गव्हाण फाटा ते दिघोडे रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणार्या व येणार्या टँकर आणि ट्रेलरमध्ये सोमवारी (दि.28) रात्रीच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी सध्या गव्हाण फाटा ते दिघोडे रस्त्यावरून मालाची, दगड माती भरलेल्या अवजड वाहनांची वर्दळ करण्याचे परवाने संबंबितांना दिले आहे.त्यामुळे रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणात नवी मुंबई, चिरनेर, जेएनपीटी बंदराच्या दिशेने ये-जा करणार्या अवजड वाहनांची रेलचेल सुरू असते. त्यामुळे अपघाताची संख्या बळावली आहे.