कामथे येथे भिषण अपघात

दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।

मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तेजस बाळाराम गुरव असे या मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस दुचाकीने लोटे येथील सुप्रिया केमिकल कंपनीतून कामावरून घरी येत असताना कामथे येथे आला असता एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, त्यात तेजसचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

Exit mobile version