माणगावमध्ये कार दुभाजकाला धडकल्याने भीषण अपघात; महिलेचा मृत्यू

| माणगाव | प्रतिनिधी |

पुणे, माणगाव, दिघी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. तालुक्यातील मौजे सणसवाडी गावच्या हद्दीत मारुती सुझुकी वॅगनार गाडीची दुभाजकाला धडक लागून अपघात झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.4) माधव मेहता हे त्यांचे मालकीची मारुती सुझुक वॅगनार गाडी स्वतः चालवित घेऊन जात असताना पुणे- माणगांव रोडने ताम्हीणी घाट मार्गे जात असताना मौजे सणसवाडी गावच्या हद्दीत टी. पॉईंट  पुढे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आल्यावेळी अचानक त्यांच्या कार समोर कुत्रा आल्याने  त्यांनी कार रोडच्या उजव्या बाजुला घेतली असता रोडच्या कडेला असलेल्या दुभाजकाला कारची ठोकर लागुन अपघात झाला. या अपघातात  त्यांच्या पत्नी  निलीमा माधव मेहता, (70) यांच्या तोंडाला, उजव्या हाताच्या कोपऱ्याला गंभीर दुखापत होऊन उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या अपघातात गाडीचे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. जाधव करीत आहेत.

Exit mobile version