| उरण | वार्ताहर |
जेएनपीए बंदर ते चिर्ले एक्स्प्रेस महामार्गावरील गंगा रसोई समोरील सर्व्हिस रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचाऱ्यांना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना गुरुवारी (दि.24) रात्री घडली. या अपघातात दोन पादचारी ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ठार झालेल्यांची ओळख पटली नाही.
हा अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याशिवाय अपघातानंतर चांदणी चौक येथील खड्ड्यात मालवाहू ट्रेलर पडल्याची घटना शुक्रवारी (दि. 25) घडली.त्यामुळे नोकरदार प्रवासी नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघाताचे गांभीर्य ओळखून नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांनी लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.