महाडजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

xr:d:DAFT9h13XAo:5,j:43219497372,t:22120606

| महाड | वार्ताहर |

राज्य मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी (दि.13) रोजी घडली आहे. भरधाव टेम्पोचे उतारावर नियंत्रण सुटलेल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या रिक्षेला धडक दिली. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून, 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथे उपचारासाठी नेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मिनी डोअर रिक्षाचालक सुधीर गीजे हे मंगळवारी (दि.13) रोजी दुपारी चारच्या सुमारास महाड येथून विन्हेरे गावाकडे जात होते. बिज घर गावाजवळ दापोलीकडून मुंबईकडे येणाऱ्या टेम्पो चालकाचे उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या सुधीर गीजे यांच्या रिक्षेला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षेत प्रवास करणारा मंथन भिलारे(13) मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर श्रद्धा मापुस्कर (60) यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या अपघातात आणखी सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. राजेंद्र भिलारे रा. शिरवली (35), अर्चना धोत्रे रा. महाड (27), रियांश रेडीज रा. मुंबई (7), सुधीर गीजे रा.विन्हेरे (39), श्रीकांत मापुस्कर रा. विन्हेरे (65), श्रेयशी रेडीज रा. विन्हेरे (37) अशी जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. या अपघातानंतर टेम्पो चालक गाडी सोडून पळून गेला आहे.या घटनेचा अधिक तपास महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

Exit mobile version