मुंबई-गोवा महामार्गावर एसटी व कारमध्ये भीषण अपघात

पेण । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला असून एसटी व कारमध्ये समोरा समोर ठोकर झाली. पेण तालुक्यातील जिते गाव हद्दीत हा अपघात झाला. या अपघातात 3 जण जखमी, पैकी 2 जण गंभीर जखमी असल्याचे समजते. हा अपघात झाल्याचे समजताच अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून जखमींना तात्काळ सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या घटने बाबत अधिक तापस पोलीस करीत आहेत.

Exit mobile version