कोलाड-भिरा मार्गावर भीषण अपघात

। कोलाड । प्रतिनिधी ।

कोलाड-भिरा मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत असून, त्यात मुख्यतः मालवाहू ट्रेलर पलटी होण्याच्या घटना घडतच आहेत. हे ट्रेलर कोलाड-भिरा मार्गावरून पास्को या मल्टीनॅशनल कंपनीकड़े जातात. दि.10 ऑगस्ट रोजी 6.30 च्या सुमारास पहुर गावच्या हद्दीत खान क्रेशरजवळील वळणावर कॉईल वाहतूक करणारा ट्रेलर पलटी होण्याची घटना घडली. यामध्ये जिवितहानी झाली नसून ट्रेलर व कॉईलचे नुकसान झाले असल्याचे समजते. या बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहिती नुसार, कोलाड पोलीस ठाणे हद्दीत आरोपी रा.पहूर, जामगाव याने त्याच्या ताब्यातील ट्रेलर क्रमांक एम.एच.46.बीबी.0829 मधुन कॉईल घेवुन कोलाड-भिरा मार्गे जात होता. यावेळी पहूर गावाजवळ आले असता गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रेलर पलटी झाला. याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस हवालदार राऊळ हे करीत आहेत.

Exit mobile version