। कोलाड । वार्ताहर ।
कोलाड- भिरा मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत असून,त्यात मुख्यता मालवाहू ट्रेलर पलटी होण्याच्या घटना घडतच आहे. या ट्रेलर गाड्यांची भीती कायम असतानाच सुतार वाडी गावच्या हद्दीत मालवाहू ट्रेलर पलटी होण्याची दूर्देवी घटना घडली.
भिरा-कोलाड रोडवर ट्रेलर अतीवेगाने, चालवील्याने ट्रेलर रस्त्याचे खाली उत्तरून आंब्याचे झाडाला टोकर लागुन अपघात होऊन ट्रेलरचे व ट्रेलर वरील लोखंडी कॉइलचे नुकसान झाले.याबाबत कोलाड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला कोलाड सपोनि सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.