| पाताळगंगा | काशिनाथ जाधव |
मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिटजवळ अचानक ट्रकचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे ट्रकची समोरील कठड्याला धडक देऊन लोखंडी रेलिंग तोडून तो 20 फूट दरीत कोसळला. या भीषण अपघातात यात ट्रकमधील क्लिनरचा जागीच मृत्यू झाला तर चालकाने ट्रकमधून उडी मारल्याने तो जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि.12) घडली.
ट्रक चालक कर्नाटकवरून माल घेऊन अंबरनाथकडे मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवरुन जात असताना बोरघाटात आला असता त्याचे ब्रेक निकामी झाले. त्याने खोपोली एक्झिटजवळील लोखंडी रेलिंगला जोरदार धडक देऊन ट्रक 20 फूट दरीत कोसळला. यामध्ये चालकाने तत्परतेने बाहेर उडी मारल्याने तो बचावला असून क्लिनरचा ट्रकमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला. चालकाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, अपघातग्रस्त सामाजिक संस्थेचे सदस्य, देवदूत यंत्रणा, आय.आर.बी यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रकमध्ये अडकलेल्या क्लिनरला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.