भीषण अपघात! महिला जागीच ठार; दोघेजण गंभीर जखमी

| गोवे-कोलाड | विश्वास निकम |
मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाक्यावर रिक्षा आणि मालवाहू टेम्पो यांच्यात सोमवारी (दि.9) भीषण अपघात झाला. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे आंबेवाडी नाक्यावर खळबळ उडाली.

कोलाड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, आयशर टेम्पो चालक ए.एच 12 एम 4536 हा महाड बाजूकडे जात होता. यावेळी आंबेवाडीतील सरकारी रुग्णालयाजवळ आला असता महाडकडुन मुंबईकडे जाणारी रिक्षा एम.एच 06 बी.व्ही 4642 ही वरील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याने समोरुन येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाममध्ये मागे बसलेल्या भागीरथी खार येथील प्रवाशांपैकी सेजल किसन गायकर (31) या महिलचा जागीच मृत्यू झाला. तसेच अन्वी किसन गायकर (2) हीस गंभीर स्वरुपाच्या दुखापती झाल्या व किसन गायकर (32) हे किरकोळ जखमी झाले.

या घटेनची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

Exit mobile version